MANGI SMART GRAM
स्मार्ट ग्राम मंगी / बु
आदर्श ग्रामपंचायत मंगी / बु ची यशोगाथा :-
नमस्कार मित्रांनो ....
तुम्हाला काय वाटतं की पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो का ?
नक्कीच होऊ शकतो.
पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो त्यासाठी फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि गावकऱ्यांची साथ पाहिजे.
हे सिद्ध करून दाखवलंय मंगी बु गावाने..
जिल्हा परिषद चंद्रपूर , पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारे ग्रामपंचायत मंगी बु येथे पाच वर्षात मंगी बु गावात बरीच विकास कामे झाली आहे.
आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे.त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता आमचे गाव मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे.
तसेच गावात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बनवण्यात आले आहे.
या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल, बाभूळ या प्रकारच्या प्रजाती आहे.
मंगी बु गावांमध्ये लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी मंगी बु गावामध्ये RO फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगी बु गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात आले आहे..
ग्रामस्थाच्या आरोग्यासाठी ओपन जीम ची व्यवस्था केली आहे. व तरूण मुलांसाठी वेगळी व्यायामशाळा उभारली आहे.
शाळेतील मुलांना अभ्यास करण्याकरीता ,गावातील होतकरू मुलाना अभ्यास करण्याकरिता व ग्रामस्थासाठी वाचनालयाची व्यवस्था केली आहे. गावात सांडपाण्याची उत्तम व्यवस्थापन,नियमित शौचालायाचा वापर,रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गरजू वेक्तीला काम मिळाला आहे.नियमित बालकाचे लसीकरण व 18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. प्लास्टिक वापरास बंदी,एलईडी बलचा वापर, बॉयोगास सयंत्राचा वापर, घनकचरा व्यवस्थापन तसेच लोकसहभागातून जलयुक्त शिवार, पावसाचे पाणी पुनर्भरण, बंधारे व वनराई बंधारे बनवण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मंगी बु गावचे वार्षिक उत्पन्न फार कमी आहे.
घर टॅक्स पण खूप प्रमाणात कमी आहे.
त्यामधून कर्मचारी वेतन ऑपरेटर वेतन, गावातील दिवाबत्तीची सोय, रंगरंगोटी.
व ईतर खर्च यातून अर्धी निधी निघून जाते.आणि उर्वरित पैशात गाव विकास शक्य नाही.
म्हणून सगळी धावपळ करून गावाला कशा पद्धतीने बक्षिस मिळेल या प्रयत्नांमध्ये गावाला २०१८ मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार अंतर्गत गावाला अकरा लाख रुपयाचे बक्षीस प्राप्त करून घेतले
गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार,
२०२१-२०२२ चा जिल्ह्यातून प्रथम आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार ५० लाखाचा पारितोषिक व तालुकातून प्रथम आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार १० लाखाचा पारितोषिक एकूण ६० लाखाचा पारितोषिक मिळेल यात काही संकाच नाही.
जिल्ह्यातून प्रथम रा. संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार् मिळाला आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार,तसेच विविध मान्यवर विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य गण ,व आसपासच्या कंपनीतील लोकांनी आदर्श ग्राम मंगी बु ची पाहणी करून प्रशंशा केली.
मंत्री महोदय असो जिल्हा परिषद अध्यक्ष,, सदस्य असो आमदार साहेब असो,
पंचायत समिती सदस्य असो,
यांच्या कडून गावाकरिता निधी मिळावा म्हणून पाच वर्षांपासून सतत धावपळ करणारे आमच्या गावचे माझी उपसरपंच व कट्टर शिवसैनिक ( शिवसेना तालुका प्रमुख राजुरा) वासुदेव चापले यांनी सतत गावाच्या विकासाकरिता दिवसरातत्र धावपाळ केली.
गावात निधी आणुन गावाचा विकास केला.
तसेच २०१२ पासून गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सतत मदत करणारे ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम सर यांनी गावाला स्वच्छ व सुंदर करण्यात मेहनत घेतली.
पाच वर्षाच्या कालावधी मध्ये मंगी बु गावांमध्ये येथे सर्वप्रथम हाय मॅक्स लाईट बसविले.त्यानंतर संपूर्ण बंदिस्त नाली सिमेंट रोड, ग्रामपंचायत भवन, व्यायाम शाळा,वाचनालय पिण्याच्या पाण्याची टाकी, RO फिल्टर वॉटर ,कचराकुंडी, लोकांना बसण्याकरीता सिमेंटी खुर्ची, संपूर्ण गावामध्ये रंगरंगोटी चित्रीकरण,शाळा डिजिटल,भविष्यात पाणी टंचाई येऊ नये म्हणून सार्वजनिक व वैयक्तिक शोषखड्डे,सार्वजनिक शौचालय, स्मशान भूमी रोड,तसेच विविध प्रकारचे विशेष योजना राबवल्या आहेत.
आमचे गाव कसे समृद्धीने भरभराटीने उज्वल होईल आणि सर्व सुख-सुविधा मूलभूत गरजा लोकांना कशा पुरविल्या जातील याकडे आमचे सार्वधिक भर राहणार.
आमचे गाव कसे सुजलाम सुफलाम होईल याकडे लक्ष वेधले आहे.
या सर्व विकासामध्ये माझ्या गावचे ग्रामसेवक गजानन वंजारे ,माझी सरपंच रसिका पेंदोर,उपसरपंच वासुदेव चापले व सदस्य गण,ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम सर, शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे सर,कृषीमित्र शंकर तोडासे , ग्रामपंचायत कर्मचारी , आशा वर्कर अंगणवाडी सेविका,शाळेचे सर्व शिक्षक वृंद,,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष आणि तसेच गावातील दररोज पहाटे नित्यनियमाने पाच वाजता उठून गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सतत मदत करणारे नागरिक व इतर कर्मचारी महिला,यांच्या सहभागामुळेच हे सगळे शक्य झाली आहे.
कारण एकटा ग्रामसेवक किंवा उपसरपंच गाव विकास करू शकत नाही त्याकरिता सर्वांची मदत असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे .
मंगी (बु ) गाव कसे सुजलाम सुफलाम होईल आणि सर्व सुख सुविधा मूलभूत गरजा लोकांना कशा पुरवल्या जातील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
येणाऱ्या पाच वर्षात खूप सारे विकास कामे मंगी बु गावात करायचे आहे. गावातील प्रत्येक गरजु वेक्तीला घरकुल मिळवून देणे,
गावातील वॉर्डा-वॉर्डात सार्वजनिक शौचालाय बनवणे,गावातील नागरिकांना आंघोळ करण्याकरीता वॉर्डा-वॉर्डात व चौकात गरम पाण्याची टाकी बसवणे, चौका-चौकांमध्ये हात स्वच्छ करण्याकरीता बेसिन लावणे,
सीसीटीव्ही कॅमेरे, मुलांना खेळण्याकरिता सर्व साहित्य पुरवणे, मुलांना शैक्षणिक अभ्यास मोबाईलवर करण्याकरीता व गरजू लोकांना इंटरनेटसाठी गावात चौका-चौकात वायफाय नेटवर्क लावणे,गावातील उर्वरित राहिलेल्या सर्व सीसी रोड पेव्हर ब्लॉक बसविणे,ग्रामपंचायत कडे जाणारा रोड व परिसर सौंदर्यीकरण करणे,
स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसराचे सौंदर्यीकरण व तिथे आक्सीजन पार्क बनवने,स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रोड चे सौंदर्यीकरण, नाला खोलीकरण व सरळीकरण करणे , पांदण रस्ते बनविणे, गावातील मुले मुली महिला पुरुष यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता पुढचे प्रयत्न करणे, ८००० नवीन वृक्ष लागवड यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करणे.
हे आहे आमच्या आदर्श ग्रामपंचायतचे पुढचे उद्दिष्ट........
येणाऱ्या पाच वर्षात मंगी बु गावचे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की....!
धन्यवाद तसेच सर्वांचे आभार.
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
ग्राम रोजगार सेवक :-दिनेश राठोड मंगी /बु यांच्या लेखणीतून-
(८७६६९५३१०९)
आपल्याला माहीत आहे, आजकाल आदर्श गाव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हिवरेबाजार, राळेगण, सिद्धी आणि पाटोदा या गावाचे चित्र समोर उभे राहते
परंतु चंद्रपुर जिल्ह्यातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत मंगी बु चे सरपंच श्रीमती रसीका पेंदोर उपसरपंच वासुदेव चापले ग्रामसेविक गजानन वंजारे व ग्रामस्वच्छता समिती चे अध्यक्ष परसुराम तोडासाम यांनी गावातील सर्व नागरीकांच्या लोकसहभागाणे व सहकारी सर्व टीम च्या मेहनतीने हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळे कोरण्याच्या तयारीत आहे....
आदर्श गाव मंगी बु
Smart village mangi bk
काही माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव ही एखाद्याचं प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्याला पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून उभं राहातं एक आदर्श गाव. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील मंगी बु गावाची ही गोष्ट.
काही वर्षांपूर्वी या गावाचं चित्र ही इतर गावांपेक्षा वेगळं नव्हतं. उघडी गटारे, चिखलाने भरलेले रस्ते, आपसी हेवेदावे यानं हे गाव ही ग्रासलं होतं. पण वासुदेव चापले नावाच्या उपसरपंचान गावाचं हे रुप बदलून टाकायचं ठरवलं आणि त्याच्यापाठीशी ठाम उभं राहून अख्ख्या गावानं त्याला साथ दिली.
गाव एका गुलाबी रंगात रंगले असून ऐक्याचा हा धागाच गावाला महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानात बक्षीस देऊन गेला.
ग्रामविकासाचा कळस असं ज्या योजनेचं वर्णन केलं जातं त्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावानं सहभाग घेतला आणि गावाला पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाची दिशा मिळाली आहे.
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा मंगी बू शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या निरोगी आरोग्यासाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेण्डिंग मशिन बसविण्यात आली असू्न ,यामुळे यंदा विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन व्हेण्डिंग मशीन आणि नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर मशिनची सुविधा शाळांच्या स्वच्छतागृहात उपलब्ध होणार आहे.
या व्हेंडिंग मशीनमधून सॅनिटरी नॅपकिन फक्त ५ रुपयांत उपलब्ध होणार आहे.



mind blowi9ng
ReplyDelete