Posts

Showing posts from 2021

ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर का ? भरावेत?

Image
  आदर्श ग्रामपंचायत मंगी (बु.) घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरा .ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर का ? भरावेत? ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर, व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या...

वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.

Image
  वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.  ग्रामसेवक गजानन वंजारे,मुख्याध्यापक आर आर भेंडे सर, उपसरपंच वासुदेव चापले,ग्रामविकास समिति चे अध्यक्ष तोडासाम सर, ग्रामपंचायत सदस्य शंकर तोडासे, अंगणवाडी सेविका शारदा शिरसागर व भिमबाई कन्नाके, आशा वर्कर  मंदा मत्ते, ग्राम रोजगार सेवक -दिनेश राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी नितिन मरसकोल्हे व चरनदास चिलकुलवार, डाटा ऐन्ट्री ऑपरेटर बालाजी मुंडे.  यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळ...

राजुरा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गाव 100 टक्के लसीकरणयुक्त झाले आहे.18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे मंगी बु गावाने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेत १००% लसीकरण युक्त गाव होण्याचा मान प्राप्त केला आहे.

Image
 राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination program) वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. या लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील  पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी आदर्श ग्रामपंचायत मंगी बु (smart village mangi bk). 18 वर्षावरील व 45  वर्षावरील  नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे.   माझे गाव, लसीकरण युक्त गाव, असा निर्धार करत राजुरा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गावाचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले.  कोरोना बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे कसे आवश्यक आहे, याबद्दल जनजागृती करत नागरिकांची प्रथमतः मानसिकता तयार केली गेली.  100% लसीकरण करण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा ,  अम्बुजा सिमेंट फांऊडेंसन यांचे सहकार्य मिळाले व माझ्या गावचे उपसरपंच ,संरपच सदस्य गण ग्रामसेवक आशा अंगणवाडी सेविका मुख्यध्यापक, शिक्षक वृंद, स्वच्छता समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक महिला ...

जिच्या मनावर व शरीराच्या कणाकणावर भरभरून प्रेम केले, ती प्रेयसीच दुसऱ्या कुणाच्या लग्नबंधनात गुलाम व्हावी, असे कधी वाटल नव्हत

Image
 जिच्या मनावर व शरीराच्या कणाकणावर भरभरून प्रेम  केले, ती प्रेयसीच दुसऱ्या कुणाच्या लग्नबंधनात गुलाम व्हावी, असे कधी वाटल नव्हत. शिवाय, स्वतःच्या जीवनाची जळून जळून निर्माण झालेली काजळी हा प्रियकर झटकून टाकायला तयार नाही. ज्या व्यक्तीवर निस्सीम प्रेम असते तिच्याशीच लग्न का होवू नये ? प्रेमासारख्या प्राकृतिक सत्याला समाजाची  सांस्कृतीक मान्यता का मिळत नाही. अर्थात प्रेम एकाशी व लग्न दुसऱ्याशी.. 😰😥😢😰😥😢😰😥😥😢 हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर आहे, इंजिनीअर आहे, शिक्षक आहे,  एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं ...