वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.
वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.
भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.
ग्रामसेवक गजानन वंजारे,मुख्याध्यापक आर आर भेंडे सर, उपसरपंच वासुदेव चापले,ग्रामविकास समिति चे अध्यक्ष तोडासाम सर, ग्रामपंचायत सदस्य शंकर तोडासे, अंगणवाडी सेविका शारदा शिरसागर व भिमबाई कन्नाके, आशा वर्कर मंदा मत्ते, ग्राम रोजगार सेवक -दिनेश राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी नितिन मरसकोल्हे व चरनदास चिलकुलवार, डाटा ऐन्ट्री ऑपरेटर बालाजी मुंडे.
यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली.
यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखुन आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथे वृक्ष रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यात आले.
ग्रामरोजगार सेवक मंगी बु -: दिनेश राठोड यांच्या लेखणीतून
























Comments
Post a Comment