राजुरा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गाव 100 टक्के लसीकरणयुक्त झाले आहे.18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे मंगी बु गावाने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेत १००% लसीकरण युक्त गाव होण्याचा मान प्राप्त केला आहे.
राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination program) वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. या लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी आदर्श ग्रामपंचायत मंगी बु (smart village mangi bk).
18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
माझे गाव, लसीकरण युक्त गाव, असा निर्धार करत राजुरा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गावाचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले. कोरोना बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे कसे आवश्यक आहे, याबद्दल जनजागृती करत नागरिकांची प्रथमतः मानसिकता तयार केली गेली.
100% लसीकरण करण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा , अम्बुजा सिमेंट फांऊडेंसन यांचे सहकार्य मिळाले व माझ्या गावचे उपसरपंच ,संरपच सदस्य गण ग्रामसेवक आशा अंगणवाडी सेविका मुख्यध्यापक, शिक्षक वृंद, स्वच्छता समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक महिला यांच्या सहभागामुळेच गाव १००% लसीकरण करण्यात शक्य झाले.
विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. कोरोनामुक्त असलेले हे गाव आता गावातील सर्व लाभार्थींना पहिला डोस मिळालेले गाव ठरले आहे.
ग्रामग्रामपंचायत मंगी बु अंतर्गत येणारा गावात 18 वर्षांपुढील 1163 नागरिक असून या सर्वाना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
कोरोनाची सेवटची लस गंगाबाई (वय 89) व भिकाजी चव्हाण (वय 85 ) या दोन्ही सखे बहिन भावाला सेवटची कोरोनाची लस देवुन गाव १००% लसीकरण युक्त गाव म्हनुन घोषीत करण्यात आले..
धन्यवाद तसेच सर्वाचे आभार...
💉💉💉🙏🙏🙏💉💉💉
- ग्रामरोजगार सेवक :- दिनेश राठोड
rathoddinesh10297@gmail.com
- 8766953109. 7820981109
गावात 100 टक्के लसीकरण करण्याचा लेखी पुरावा..




















Comments
Post a Comment