द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला.

 स्मार्ट ग्रामपंचायत मंगी बु अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडाची दखल घेवून विभागीय स्तरावर रोजगार संघ अंतर्गत सत्कार व द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.


रोजगार संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे वृक्षसखा पुरस्कार घोषित झाले असून प्रथम क्रमांकाची मानकरी अमरावती जिल्ह्यातील जरूड ही ग्रामपंचायत ठरली तर द्वितीय क्रमांकाची मानकरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला. तिसऱ्या पुरस्काराची मानकरी सावनेर तालुक्यातील रोहना ही ग्रामपंचायत ठरली..

रोजगार संघाच्या वतीने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी एक जून ते एक डिसेंबर या कालावधीत वृक्षसखा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यात वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनावर देखील या स्पर्धेमध्ये भर देण्यात येत असतो.

ज्या ग्रामपंचायती अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करतात त्यांना दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी वृक्षसखा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असतो. सन्मानामध्ये रोख रक्कम,

स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र यांचा समावेश असतो.

'रोजगार संघ' ही असंख्य प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक प्रा. संजय नाथे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील काही ध्येयवादी तरुणांनी एकत्र येत चालविलेली ग्रामविकासाची चळवळ आहे. तरुणांचा आणि गावाचा शाश्वत विकास हे स्वप्न उराशी घेऊन रोजगार संघ वाटचाल करीत आहे. या वाटचालीत असंख्य गावे सोबतीला आली. सुंदर झाली. तरुणांना दिशा गवसली. वातावरणातील बदल बघता पर्यावरण हा आपल्या सर्वांच्या जीवनमरणाचा विषय ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आपणा सर्वांचा हातभार लागावा म्हणून राज्यस्तरीय 'वृक्ष लागवड' स्पर्धा आयोजित करण्यात येते. जे अधिकाधिक वृक्षारोपण करून त्याचे योग्य संगोपन करतील त्यांना रोजगार संघातर्फे दरवर्षी 'वृक्षसखा' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत असतो.









Comments

Popular posts from this blog