ऑक्सिजन पार्क व सायन्स पार्क अभ्यास दौरा
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मंगी खुर्द येथील विद्यार्थी अगदी जवळच असलेल्या मंगी बुज येथील ऑक्सिजन पार्क व सायन्स पार्क ला भेट देऊन तेथील अभ्यास दौरा करण्यात आला...
- ऑक्सिजन पार्क -
मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे.
या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात साग पेरु जांभूळ, अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल, बाभूळ या प्रकारच्या प्रजाती आहे.
- सायन्स पार्क -
खेळांमधून मुलांना विज्ञान कळावे या हेतुने तयार केलेल्या Parabolic disc (कुजबुजनारी बाग) या उपकरणातून मुलांना ध्वनीची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. याप्रमाणे पेरिस्कोप, पेंड्युलम, तरफे मुळे कार्य कसे सोपे होते, क्रिया प्रतिक्रिया, जीएसएलव्ही, उपग्रहांच्या विषुववृत्तीय कक्षा आणि ध्रुवीय कक्षा, पवनचक्की आणि वाऱ्याची निर्मिती, गुरुत्व खुर्ची (The construction of the chair is such that the centre of gravity of your body along with that of the chair lies much below the centre of the pivot fulcrum. As a result irrespective of how much you try to swing, you will never topple. Swing and enjoy) या आणि अश्या अनेक विज्ञान विषयक संकल्पना उपकरणाच्या आणि बाला पेंटिंगच्या माध्यमातुन स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला गेलेला आहे.
ढोबळमानाने पाहिले तर रमण सायन्स सेंटर नागपूर, पिंपरी चिंचवड सायन्स केंद्र पुणे, रयत सायन्स एंड इनोवेशन सेंटर सातारा आणि मोजक्याच मेट्रो सिटी मधील तुरळक खाजगी कॉनव्हेंट शाळांमध्ये असे सायन्स पार्क दिसून येतात. मात्र मंगी बुज सारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असा प्रकल्प राबवणे ही मोठी कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल उत्तेजीत करुन त्यानां तो विषय रोमांचक आणि आकर्षक वाटावा आणि परिणामी विज्ञानावादामध्ये स्वारस्य असलेली नवीन पिढी तयार व्हावी ही अपेक्षा या प्रकल्पातून निच्छितच करता येईल.




















Comments
Post a Comment