Corona Vaccination : पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींचा 100% लसीकरण करणारं चंद्रपुर जिल्हातील तिसरे गाव -मंगी गाव.

 . Corona Vaccination : 

पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींचा 100% लसीकरण करणारं चंद्रपुर जिल्हातील तिसरे गाव -मंगी बु गाव..




चंद्रपुर:- दि-५/७/२०२१ सोमवार

चंद्रपुर जिल्हातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणार मंगी बु  गावानं 45 वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारे चंद्रपुर जिल्हयातील बहुधा हे दुसरे किंवा तीसरे गाव नक्की असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल.


कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे.  हेच शास्त्र वापरत चंद्रपुर जिल्हातील आदर्श ग्रामपंचायत मंगी बु गावानं 45 वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारे चंद्रपुर जिल्हातील बहुधा हे दुसरे किंवा तिसरे गाव नक्की असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

चंद्रपुर जिल्हातील पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी आदर्श ग्रामपंचायत मंगी बु हे गाव.  गावची लोकसंख्या जेमतेम  725. या छोट्याशा गावांनं कोविडच्या संकटाच्या काळाला एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या गावातील 45 वर्षावरील व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करून घेतले आहे. तेही गावात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतांना हे विशेष.

गावातील लोक सुरवातीला लस घेण्यासाठी  लोकांच्या मनात भीती होती. काही लोक कोरोना झालाच नाही तर लस का घ्यावी,मला काही होत नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित करत पण प्रत्येक प्रश्नच उत्तर देत गावकऱ्यांची लसीकरण बाबत एकवाक्यता झाली. गावातील भिमबाई जाधव  आणि जयाबाई राठोड  मोठ्या अभिमानाने सांगतात लस घेतली शेतात गेले काम केलं घर काम केलं काहीही झालं नाही.लसीकरणच नाही तर गावात कोरोनाचे सर्व नियम पाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत महाभयंकर ठरलेल्या कोरोनाला सुद्धा या गावात एन्ट्री करता आली नाही. गावात आशा वर्कर , आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी गावात फेरी काढली. लोकांना लसीकरणाच महत्व सांगितले. त्यानंतर गावात लसीकरणाचा कॅम्प लावला.

मंदा मत्ते आशा वर्कर  सेविका घराघरात गेल्या लसीकरणाचे महत्त्व सांगितलं. स्वतः लस घेतली, लोकांना त्याचे फायदे सांगितले. मग हळूहळू लोक लस घ्यायला तयार झाले. गटविकास अधिकरी रामावत साहेबांनी वेळोवेळी लस पुरवली.जसकाही त्यांनी मंगी बु गावाला दत्तकच घेतला असेल.

संरपच रसीका पेदोंर,उपसंरपच वासुदेव चापले मुख्यध्यापक रत्नाकर भेंडे सरांनी, सर्व शिक्षकानी व वंजारी ग्रामसेवकानी,ग्रामपंचायत सदस्य शंकर तोडासे, पोलीस पाटलानी,स्वच्छता समीतीचे अध्यक्ष तोडासे सर, तंटामुक्ती अध्यक्ष वेडमे,नितीन मरसकोल्हे, चरनदास चिलकुलवार यांनी लसीकरणासाठी मोठी मेहनत घेतली. सुरुवातीला गावात लसीकरणाच मिळत नव्हता नंतर लसीकरण करण्यासाठी कॅम्प मिळाला तर गावकरी तयार नव्हते त्यांचे मनोबल वाढवले ,गावकरी तयार झाले.आज 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण झालं आहे.

18 वर्षावरील वक्तीचे 80 % लसीकरण या गावचे झाले आहे.

या गावकऱ्यांनी केवळ आपल्या गावात नाही तर आजूबाजूच्या काही खेड्यातील लोकांना देखील एकत्र करून ही लस दिली आहे .त्यामुळे या गावकऱ्यांचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे. तरच गावागावातून नव्हे तर देशातूनही  कोरोना हद्दपार होईल. 

 सगळ्या नकारात्मक वातावरणात मंगी बु  गावात एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नसताना पॉझिटिव्ह विचार करून 45 वर्षावरील सगळ्या व्यक्तींचे लसीकरण केले. या गावच्या सकारात्मक विचारांचा आदर्शच कोरोनामुक्ती कडे घेऊन जाणार आहे. 

          :- दिनेश राठोड  -८७६६९५३१०९



















Comments

Popular posts from this blog