जिच्या मनावर व शरीराच्या कणाकणावर भरभरून प्रेम केले, ती प्रेयसीच दुसऱ्या कुणाच्या लग्नबंधनात गुलाम व्हावी, असे कधी वाटल नव्हत
जिच्या मनावर व शरीराच्या कणाकणावर भरभरून प्रेम केले, ती प्रेयसीच दुसऱ्या कुणाच्या लग्नबंधनात गुलाम व्हावी, असे कधी वाटल नव्हत.
शिवाय,
स्वतःच्या जीवनाची जळून जळून निर्माण झालेली काजळी हा प्रियकर झटकून टाकायला तयार नाही.
ज्या व्यक्तीवर निस्सीम प्रेम असते तिच्याशीच लग्न का होवू नये ? प्रेमासारख्या प्राकृतिक सत्याला समाजाची सांस्कृतीक मान्यता का मिळत नाही.
अर्थात
प्रेम एकाशी व लग्न दुसऱ्याशी..
😰😥😢😰😥😢😰😥😥😢
हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय
झालेला आहे.
माझा जावई डॉक्टर आहे, इंजिनीअर आहे, शिक्षक आहे, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.
आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात.
आजकालचे आईवडील मुलगा शोधताना मुलामध्ये काय बघतात तर ,
कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही - नको
शेत नाही- नको
शेती करतो - नको
धंदा करतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे- नको
चष्मा आहे - नको
बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ?
तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून नकार देत राहणार आणि ... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं.
- दिनेश राठोड.




Comments
Post a Comment