MANGI SMART GRAM
स्मार्ट ग्राम मंगी / बु आदर्श ग्रामपंचायत मंगी / बु ची यशोगाथा :- नमस्कार मित्रांनो .... तुम्हाला काय वाटतं की पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो का ? नक्कीच होऊ शकतो. पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो त्यासाठी फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि गावकऱ्यांची साथ पाहिजे. हे सिद्ध करून दाखवलंय मंगी बु गावाने.. जिल्हा परिषद चंद्रपूर , पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारे ग्रामपंचायत मंगी बु येथे पाच वर्षात मंगी बु गावात बरीच विकास कामे झाली आहे. आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे.त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता आमचे गाव मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे. तसेच गावात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बनवण्यात आले आहे. या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळ...