यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत, पोळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो, त्याकाळात मला काही अनुभव आले त्यातील काही प्रसंग सांगतो मी तुम्हाले. १) पहिला प्रसंग असा होता - उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी एका लग्नाचा पत्रिक आली होती आणि घरचा प्रमुख व्यक्ती मीच असल्यामुळे घरचे कामात असल्यामुळे तू तिकडे जा असं घरच्यांनी सांगितल .कारण घरी मी एकटाच रिकामटेकडा आहे असं वाटतं तरी मी लग्नाला गेलो . लग्न आटोपल्यानंतर मी बाजूला थांबलो होतो. तेवढ्यात त्या गावातील चार-पाच जनांचा समूह माझ्यापाशी आला आणि विचारलं कधी लागणार तुला नोकरी.....नोकरीचं काय....मला वाटलंच होतं की कोणीतरी हा प्रश्न विचारून मला अडचणीत आणणार हीणवणारच... २) दुसरा प्रसंग असा होता.. पोळ्याच्या दिवशी आजी आणि आई म्हणाली. तांड्यातील सगळ्या वडीलधाय्रा माणसांचा पाया पळून आशीर्वाद घे. मि आई आणि आजीच्या आज्ञेप्रमाणे सगळ्यांच्या पाया पडायला तांड्यात प्रत्येकाच्या घरी गेलो तेव्हा प्रत्येक घर एकच प्रश्न विचारला... लागली का नोकरी तुला.. पण लक्षात आले इथला प्रत्येक जण मला नोकरी कधी लागणार य...