यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत, पोळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो, त्याकाळात मला काही अनुभव आले त्यातील काही प्रसंग सांगतो मी तुम्हाले.
१) पहिला प्रसंग असा होता   -  उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी एका लग्नाचा पत्रिक आली होती आणि घरचा प्रमुख व्यक्ती मीच असल्यामुळे घरचे कामात असल्यामुळे तू तिकडे जा असं घरच्यांनी सांगितल .कारण घरी मी एकटाच रिकामटेकडा आहे असं वाटतं तरी मी लग्नाला गेलो .
लग्न आटोपल्यानंतर मी बाजूला थांबलो होतो. तेवढ्यात त्या गावातील चार-पाच जनांचा समूह माझ्यापाशी आला आणि विचारलं कधी लागणार तुला नोकरी.....नोकरीचं काय....मला वाटलंच होतं की कोणीतरी हा प्रश्न विचारून मला अडचणीत आणणार हीणवणारच...
२) दुसरा प्रसंग असा होता.. 
पोळ्याच्या दिवशी आजी आणि आई म्हणाली. तांड्यातील सगळ्या वडीलधाय्रा  माणसांचा पाया पळून आशीर्वाद घे. मि आई आणि आजीच्या  आज्ञेप्रमाणे सगळ्यांच्या पाया पडायला तांड्यात प्रत्येकाच्या घरी गेलो तेव्हा प्रत्येक घर एकच प्रश्न विचारला...
लागली का नोकरी तुला..
पण लक्षात आले इथला प्रत्येक जण मला नोकरी कधी लागणार याचा अपेक्षित आहे.
3) तिसरा प्रसंग सांगतो मी तुम्हाले-
तिसरा प्रसंग असा होता, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात व तांड्यात फेरफटका मारत होतो.
तांड्यातील व गावातील व्यक्ती एकच प्रश्न विचारत होता, की लागली का नोकरी तुला.....कधी लागणार तुला नोकरी ?
 मला लक्षात आले इथला प्रत्येक व्यक्ती जण मला नोकरी कधी लागणार यात अपेक्षेत आहे.

वरचे तीनही प्रसंग वेगवेगळे आहेत परंतु एकच मुद्द्याला पकडून  ठेवणारे आहेत तुला नोकरी कधी लागणार ?
खरं सांगतो या आजच्या तरुणाईला समाजाकडून विचारला जाणारा Most asked question..म्हटलं तरी चालेल.
विचारणारे कोण तर प्रामुख्याने घरचे, गल्लीतले ,गावातले, घरासमोरचे, सगेसोयरे आणि आपले मित्र सुद्धा...
         आता त्यांचा प्रश्न विचारणे चूक आहे ❓
 सहाजिक आहे शिक्षण झालं तरी चांगली नोकरी कधी लागणार आमच्याकडून नाहीतर ते तरी कोणाकडून अपेक्षा ठेवणार सहाजिक आहे. त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा.
पण आधीच नोकरी मिळण्याची मारामार त्यात एखादयान सांगितलं की मी नोकरी करतोय..तर लगेच पुढचा प्रश्न गरमागरम तयारच असतो ...
नोकरी सरकारी आहे का ? आणि तिथेच आमचा पचत होतो.
कारण आजच्या घडीला सरकारी नोकरी मिळवणे म्हणजे वाळवंटात गोड पाण्याचा झरा शोधण्यासारखे आहे.
जर मग आम्ही स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली की,
सध्या नोकरी नाहीत, सरकार नोकर भरती काढत नाही, डिग्री कम्प्लीट व्हायची आहे. तर कोणी काही ऐकून घ्यायला तयार नसतं
 सगळ्यांचा एकच  आग्रह तुला सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि ती पण सरकारी ...
तरुण पोरांना मोठा अवघड वाटतं या प्रश्नाचा तोंड देणे .
मग अनेक जण मुद्दाम गावाकडे जानच टाळतात पण किती टाळणार समाजाचा सामना करावाच लागतो.
मला मात्र वाटतं की या साऱ्यांना सांगावं आमच्याकडून नोकरीची अपेक्षा जरूर करा पण सरकारी नोकरीच असायला हवी हा अट्टहास कशाला.
इथे अगोदरच आम्हा विद्यार्थ्यांची वयाची 22 ते 25 वर्षे शिक्षणात जातात त्यापुढे कधी सरकारी नोकरी मिळणार डोकं भणभणायला लागतं विचार करून जीव कंटाळतो आणि विचार करून जीव दमत. सरकारी नोकरी असलेलाच माणूस समाजात यशस्वी असतो असं मुळीच नाही ना सरकारी नोकरी नसलेल्या पण असे असंख्य अशा यशस्वी व्यक्ती या जगात आहेत .
त्यामुळे जरा तरुण मुलांना मोकळ सोडा शोधू द्या आपले मार्ग......
 Blog written by- दिनेश राठोड

Comments

Popular posts from this blog