Posts

Showing posts from 2024

द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला.

Image
  स्मार्ट ग्रामपंचायत मंगी बु अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडाची दखल घेवून विभागीय स्तरावर रोजगार संघ अंतर्गत सत्कार व द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोजगार संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे वृक्षसखा पुरस्कार घोषित झाले असून प्रथम क्रमांकाची मानकरी अमरावती जिल्ह्यातील जरूड ही ग्रामपंचायत ठरली तर द्वितीय क्रमांकाची मानकरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला. तिसऱ्या पुरस्काराची मानकरी सावनेर तालुक्यातील रोहना ही ग्रामपंचायत ठरली.. रोजगार संघाच्या वतीने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी एक जून ते एक डिसेंबर या कालावधीत वृक्षसखा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यात वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनावर देखील या स्पर्धेमध्ये भर देण्यात येत असतो. ज्या ग्रामपंचायती अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करतात त्यांना दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी वृक्षसखा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असतो. सन्मानामध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र यांच...

ऑक्सिजन पार्क व सायन्स पार्क अभ्यास दौरा

Image
  शासकीय माध्यमिक आश्रम शाळा  मंगी खुर्द येथील विद्यार्थी अगदी जवळच असलेल्या मंगी बुज येथील ऑक्सिजन पार्क  व सायन्स पार्क ला भेट देऊन तेथील अभ्यास दौरा करण्यात आला...                           -    ऑक्सिजन पार्क   - मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता  मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे. या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात  साग पेरु जांभूळ, अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल, बाभूळ या प्रकारच्या प्रजाती आहे.                             -    सायन्स पार्क   - खेळांमधून मुलांना विज्ञान कळावे या हेतुने तयार केलेल्या Parabolic disc (कुजबुजनारी बाग)...