Posts

Showing posts from 2019
Image
यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत, पोळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो, त्याकाळात मला काही अनुभव आले त्यातील काही प्रसंग सांगतो मी तुम्हाले. १) पहिला प्रसंग असा होता   -  उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी एका लग्नाचा पत्रिक आली होती आणि घरचा प्रमुख व्यक्ती मीच असल्यामुळे घरचे कामात असल्यामुळे तू तिकडे जा असं घरच्यांनी सांगितल .कारण घरी मी एकटाच रिकामटेकडा आहे असं वाटतं तरी मी लग्नाला गेलो . लग्न आटोपल्यानंतर मी बाजूला थांबलो होतो. तेवढ्यात त्या गावातील चार-पाच जनांचा समूह माझ्यापाशी आला आणि विचारलं कधी लागणार तुला नोकरी.....नोकरीचं काय....मला वाटलंच होतं की कोणीतरी हा प्रश्न विचारून मला अडचणीत आणणार हीणवणारच... २) दुसरा प्रसंग असा होता..  पोळ्याच्या दिवशी आजी आणि आई म्हणाली. तांड्यातील सगळ्या वडीलधाय्रा  माणसांचा पाया पळून आशीर्वाद घे. मि आई आणि आजीच्या  आज्ञेप्रमाणे सगळ्यांच्या पाया पडायला तांड्यात प्रत्येकाच्या घरी गेलो तेव्हा प्रत्येक घर एकच प्रश्न विचारला... लागली का नोकरी तुला.. पण लक्षात आले इथला प्रत्येक जण मला नोकरी कधी लागणार य...
Image
😍   पहिल प्रेम नोकरी  😘 माझ्या विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणजे एक  जुगाराचा खेळ आहे या खेळामध्ये कोणता पत्ता मिळेल हे आपल्या हाती नसतं पण मिळालेल्या पत्त्यावर चांगलं डाव तयार करणे हे आपल्या हाती नक्की आहे. आजच्या काळामध्ये शासकीय नोकरी म्हटलं की समाजात वेगळाच मान सन्मान आहे .स्पर्धापरीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जीवनाशी खेळ खेळला जात आहे. मुबलक प्रमाणात शासकीय नोकर भरती काढली जात आहे तसेच काढली तरी, परीक्षा फी जास्त ठेवली जाते जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना भरणं कठीण जातं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना कळत-नकळत निर्माण होत आहे. नोकरी देता का कोणी नोकरी  हा प्रश्न मला सतत त्रास देत आहे . विद्यार्थ्यांना आता छोकरी पेक्षा नोकरी वर जास्त प्रेम झालं कारण नोकरी म्हणजे- बायको मिळवण्यासाठी केलेली धडपड. अशी नोकरीची व्याख्या आजच्या काळात रूढ झाली आहे . आपल्या देशात भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्याची आर्थिक कुवत नसतानाही स्पर्धापरीक्षेची तयारी करतात. पण नोकर भरती निघत नसल्यामुळे ते निराशेच्या भावनांनी जीवन जगत आहे ...
Image
🧠🧠🧠 मेंदूत काही प्रॉब्लेम ?  बुद्धी म्हणजे नक्की काय?  एखाद्याला बुद्धी आहे हे कशामुळे सिद्ध होतं? 90 95 टक्क्यांच्या वर गुण असेल तर ते मुल बुद्धिमान ? तसं असेल तरच या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल ? सायन्स इंजिनिअरिंग मेडिकल ला गेली तरच मुलं बुद्धिमान म्हणून गणली जातात कारण चांगलं भविष्य घडवायचे असेल तर ते फक्त तिथेच आहे. अन्य  क्षेत्र म्हणजे कूचकायची आणि डाऊन मार्केट... इथे फक्त कारिअरची दिशाच चुकीची नाही तर बुद्धी ची व्याख्या चुकीची समजली जाते.  परीक्षेत मिळणाऱ्या गुणावर बुद्धी अवलंबून असते.  दहावीनंतर मुलांनी सायन्सला नाही म्हटलं तर लगेच त्यांच्या बुद्धीवर शंका घ्यायचे कारण नसतं पण आपल्याकडे हे घडते. खरंतर बुद्धी सतत सर्वत्र वापरावी लागते,       परीक्षाही आजच्या काळात महत्त्वाची असते असं मान्य केलं तरी ते मर्यादित अर्थानेच खरं आहे. . पालकांच्या अती अपेक्षांमुळे मुलाचे बालपण हरवतं. आपली बुद्धी नेमकी कोणत्या देशाने धावते याचा शोध स्वतःला घ्यावा लागतो.  जे आवडतं त्याचा ताण येत नाही, जे आवडत नाही तरीही करायला लागत...
Image
मी मी माझ्या अनुभवावरून एक सांगेन तरुणांनी व्यवसाय करायला विचार नक्की केला पाहिजे.  लोकांना काय हवंय याचा सर्वे करून आपला व्यवसाय निवडला पाहिजे. व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा प्रयोग असतो. पण व्यवसाय आयुष्य बदलवू शकतो पैसा आणि नाव कमावून देऊ शकतो . अपयशाची चिंता न करता आपण पूर्ण मेहनत आणि परिश्रम केले पाहिजे.  छोट्या शहरात देखील स्टार्ट अप सुरू होऊ शकतो. त्यासाठी नेहमी मुंबई पुणे जायची गरज  नाही. ... यशाबद्दल सांगायचं झालं तर दररोज थोडाफार ऑर्डर येत असतात. कधीकधी जास्त ऑर्डर असतात,  डिस्काउंट देत असल्यामुळे मी जास्त नफा काळात नाही पण, जो काही पैसा मिळतो त्यात मी समाधानी आहे.  पुढे व्यवसाय वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे.  मी विविध स्टार्ट अप चा अभ्यास केला तेव्हा एकच गोष्ट समजली की व्यवसाय तोच यशस्वी होतो जो ग्राहकाची गरज समजतो.  माझ्या व्यवसायाचा यश त्याच्यामुळेच झालं की की मी ग्राहकाला काय हवय ते दिलं आणि देतो. D- दिनेश राठोड

Documents

Image