Posts

द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला.

Image
  स्मार्ट ग्रामपंचायत मंगी बु अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडाची दखल घेवून विभागीय स्तरावर रोजगार संघ अंतर्गत सत्कार व द्वितीय क्रमांकाने वृक्षसखा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोजगार संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे वृक्षसखा पुरस्कार घोषित झाले असून प्रथम क्रमांकाची मानकरी अमरावती जिल्ह्यातील जरूड ही ग्रामपंचायत ठरली तर द्वितीय क्रमांकाची मानकरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या मंगी बुज गावाला जाहीर करण्यात आला. तिसऱ्या पुरस्काराची मानकरी सावनेर तालुक्यातील रोहना ही ग्रामपंचायत ठरली.. रोजगार संघाच्या वतीने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी एक जून ते एक डिसेंबर या कालावधीत वृक्षसखा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यात वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनावर देखील या स्पर्धेमध्ये भर देण्यात येत असतो. ज्या ग्रामपंचायती अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करतात त्यांना दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी वृक्षसखा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असतो. सन्मानामध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र यांचा सम

ऑक्सिजन पार्क व सायन्स पार्क अभ्यास दौरा

Image
  शासकीय माध्यमिक आश्रम शाळा  मंगी खुर्द येथील विद्यार्थी अगदी जवळच असलेल्या मंगी बुज येथील ऑक्सिजन पार्क  व सायन्स पार्क ला भेट देऊन तेथील अभ्यास दौरा करण्यात आला...                           -    ऑक्सिजन पार्क   - मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता  मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे. या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात  साग पेरु जांभूळ, अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल, बाभूळ या प्रकारच्या प्रजाती आहे.                             -    सायन्स पार्क   - खेळांमधून मुलांना विज्ञान कळावे या हेतुने तयार केलेल्या Parabolic disc (कुजबुजनारी बाग) या उपकरणातून मुलांना ध्वनीची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. याप्रमाणे पेरिस्कोप, पेंड्युलम, तरफे मुळे कार्य कसे सोपे होते, क्रिया प्रतिक्रिया, जीएसएलव्ही, उपग्रहांच्या विषुववृत्तीय कक्षा आणि ध्रु

MANGI SMART GRAM

Image
       स्मार्ट ग्राम मंगी / बु                    आदर्श ग्रामपंचायत मंगी / बु  ची यशोगाथा :- नमस्कार मित्रांनो .... तुम्हाला काय वाटतं की पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो का ? नक्कीच होऊ शकतो. पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो त्यासाठी फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि गावकऱ्यांची साथ पाहिजे. हे सिद्ध करून दाखवलंय मंगी बु  गावाने.. जिल्हा परिषद चंद्रपूर , पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारे ग्रामपंचायत मंगी बु येथे पाच वर्षात मंगी बु गावात बरीच विकास कामे झाली आहे. आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे.त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता आमचे गाव मंगी बु येथे ऑक्सिजन पार्क  उद्यान बनवण्यात आले आहे. तसेच गावात छत्रपती शिवाजी महाराज  उद्यान बनवण्यात आले आहे. या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल,  बाभूळ या प्रकारच्या प्रजाती आहे. मंगी बु गाव

ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर का ? भरावेत?

Image
  आदर्श ग्रामपंचायत मंगी (बु.) घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरा .ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर का ? भरावेत? ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर, व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या कुट

वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.

Image
  वृक्ष रक्षाबंधन: मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील मनरेगा अंतर्गत काम करनार्या मजदुर महिलांनी वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.  ग्रामसेवक गजानन वंजारे,मुख्याध्यापक आर आर भेंडे सर, उपसरपंच वासुदेव चापले,ग्रामविकास समिति चे अध्यक्ष तोडासाम सर, ग्रामपंचायत सदस्य शंकर तोडासे, अंगणवाडी सेविका शारदा शिरसागर व भिमबाई कन्नाके, आशा वर्कर  मंदा मत्ते, ग्राम रोजगार सेवक -दिनेश राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी नितिन मरसकोल्हे व चरनदास चिलकुलवार, डाटा ऐन्ट्री ऑपरेटर बालाजी मुंडे.  यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक